About Me

My photo
A learner all my life. I haven't been everywhere,but it is on my list.

Saturday, 27 October 2012

भारताची शान

Written in praise of the Indian Tricolour for an annual presentation.
This style of song is called a powada and was mostly used during the Maratha period.

भारताच्या तिरंग्याची कीर्ती बेफाम आहे
आणि सदैव राहणार .........
तिरंग्याची कीर्ती बेफ्फाम,
दुनियेत गाजते नाम 
थोकुया त्यास सलाम,जी....जी-जी-जी ...हो!

ह्या तिरंग्याला रंग किती?
अर्थातच तीन........ 
चला तर, घेऊया त्याचे ग्यान, 
का करावा सकलांनी त्याचा अभिमान?

पहिल्या रंगात आहे बलिदान,
अनेकांनी अर्पिले प्राण,
(हो का?सांगा बारा!)
नजरेत तिच्या अंगार ,
इंग्रजांवर केला तिने वार..............
झ्हान्शीची राणी म्हणाली,
नाही दूंगी नाही दूंगी,मेरी झांसी नाही दूंगी!
इंग्रजांना दिले रोकुना,
वर सांगते छाती ठोकून ,
आता पुरे तुमचा हा छळ 'दावू देश क्रांतीचा बळ ,
भगव्या रंगाची ऐका शान जी....जी,जी,जी....हो!

दुसर्या रंगत शांती अफाट,
एकजुटीची दावी  वात....
अहिंसेची देऊनी साथ ,
लावली इंग्रजांची त्यांनी वाट .
शांततेचा केला प्रचार,
जगभरी झाला जय-जयकार .
पांढर्या रंगाची न्यारी ठाट  जी....जी,जी,जी....हो!

समृद्धीचे आहे प्रतिक ,
मातीचे संगे कौतिक,
शेतकऱ्यांचा गालीतो घाम,
देशाचा त्यांस सलाम.
हिरव्या रंग देतो अशी स्पुर्ती ,
पिकाऊ मातीची सांगते कीर्ती.
हिरवा रंग अलौकिक जी...जी,जी,जी.....हो!

तीन रंगांची ऐकुनी गाथा,
जोरदार टाळ्या ऐकावा आता ..........
तीन रंगांची ऐकुनी शान ,
अभिमानाने उंचाव मान,
तिरंगा देशाची शान जी....जी,जी,जी.....हो!







No comments:

Post a Comment